या व्यक्तीने थेट बाईकलाच बनवले अ‍ॅम्बुलन्स

Image Credited – Navbharattimes

आपण अनेकदा ऐकतो की, रुग्णवाहिकेला उशीर झाल्यामुळे रुग्णाला प्राण गमवावे लागले. कधी रुग्णवाहिकेची सुविधाच नसते, तर कधी ट्रॅफिकमुळे रुग्णवाहिकेला हॉस्टिपलमध्ये पोहचण्यास उशीर होतो. यावर उपाय म्हणून हैदराबादमधील एका एनजीओने खास बाईक रुग्णवाहिका सुरू केली आहे. ही सेवा खास करून वृद्धांसाठी आहे.

Image Credited -Indiatimes

रेल्वे स्टेशनवर भीक मागून पोट भरणारे 72 वर्षीय अनूप जख्मी झाले होते. आजुबाजूच्या लोकांनी कॉल केल्यानंतर देखील रुग्णावाहिका आली नाही. याचवेळी लोकांनी हयुमन राईट्स ऑर्गनायझेशन ऑफ गुड स्मार्टीन्स इंडियाचे डायरेक्टर आणि संस्थापक जॉर्ज राकेश बाबू यांना कॉल केला. ते आपली बाईक रुग्णवाहिका घेऊन अनूप यांना आणायला गेले. बाईक रुग्णवाहिकेद्वारेच अनूप यांना हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यात आले व त्यांचे प्राण वाचले.

Image Credited -Indiatimes

सध्या हैदराबादमध्ये एकच बाईक रुग्णवाहिका आहे. लवकरच याची संख्या वाढवण्याचे काम एनजीओ करत आहे. हे एनजीओ सुरूवातील रस्त्यावर राहणाऱ्या लोकांसाठी निवारा उपलब्ध करून देण्याचे काम करत असे. एनजीओने एक वृद्धाश्रम देखील सुरू केले आहे.

Leave a Comment