या शेतकऱ्याने शेतातच बांधले मोदींचे मंदिर

Image Credited – Hindustan Times

तामिळनाडूच्या त्रिची येथे 50 वर्षीय शेतकरी पी. शंकरने आपल्या शेतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधले आहे. या मंदिराला ‘नमो’ असे नाव दिले आहे. येथे दिवसातून 4 वेळा आरती होते. शंकर यांची इच्छा आहे की, स्वतः मोदींनी येऊन मंदिराचे उद्घाटन करावे. मंदिरात मोदींच्या प्रतिमेव्यतरिक्त एमजी रामचंद्रन, जयललिता आणि तामिळनाडूची मुख्यमंत्री पलानीस्वामी यांचे फोटो देखील आहेत. पी. शंकर सांगतात की, ते देवासारखे आहेत. कारण ते येथे विकास करण्यासाठी आले आहेत.

पी. शंकर आपले गाव इराकुडीचे किसान संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सांगितले की, 2014 मध्ये मंदिर बनवण्याचा विचार करत होतो. आधी धातूची मुर्ती बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यासाठी 1 लाख रुपये खर्च येत होता. ग्रेनाईटची मुर्ती 80 हजारापर्यंत येत होती. एवढे पैसे नसल्याने दगड आणि सिमेंटची दोन फूट उंच मुर्ती तयार केली. यासाठी 10 हजार रुपये खर्च आला.

पी. शंकर यांच्यानुसार, मंदिर मोदींसाठी असलेल्या त्यांच्या प्रेमाचे उदाहरण आहे. याच्या निर्मिती मागे अनेक कारणे आहेत. याचे एक कारण मेडिकल प्रवेशासाठी होणारी नीट परिक्षा आहे. त्यांच्या मुलीला प्लस 2 मध्ये 1105 अंक मिळाले होते. मेडिकल परिक्षेत ती 2 गुणांनी नापास झाली होती. खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशनसाठी खूप पैसे मागत होते. म्हणून त्यांनी मुलीचे अॅडमिशन अण्णा युनिवर्सिटीमध्ये इंजिनिअरिंग कॉम्प्यूटर सायन्समध्ये केले. आता नीट लागू झाल्याने मेडिकलमध्ये अॅडमिशनचा अवैध धंदा बंद झाला आहे.

Leave a Comment