देशभरात पाहण्यात आले या दशकतील अखेरचे सुर्यग्रहण

Image Credited – Bhaskar

या दशकातील अखेरचे सुर्यग्रहण आज सकाळी 8 वाजून 4 मिनिटांनी सुरू झाले होते. भारतात ग्रहणकाळ 2 तास 52 मिनिटे होता. 10 वाजून 56 मिनिटांनी ग्रहण समाप्त झाले.

मुंबई, बंगळुरू, दिल्ली, चेन्नईसह देशभरात ग्रहण पाहण्यात आले. केरळच्या कारगोडा, मुंबई आणि दुबईमध्ये चंद्राने सुर्याला झाकले त्यामुळे रिंग ऑफ फायरची स्थिती निर्माण झाली. देशातील अधिकतर भागात खंडग्रास आणि दक्षिण भारतातील काही भागात कंकणाकृति सूर्यग्रहण होते. आशियातील काही देश, आफ्रिका, ऑस्ट्रेलियामध्ये देखील ग्रहण दिसले.

सूर्य ग्रहणादरम्यान धून राशीमध्ये एकसोबत 6 ग्रह होते. आज पौष महिन्यातील अमावस्या देखील होती. ग्रहणानंतर पवित्र नदीत स्नान करण्याची परंपरा होती. आता यानंतर पुढील सुर्यग्रहण हे 21 जून 2020 ला दिसेल. हे ग्रहण भारतात दिसेल. 26 डिसेंबरच्या सुर्यग्रहणानंतर एकाच राशीत 6 ग्रहांसह सुर्यग्रहणाचा योग्य आता 559 वर्षानंतर असेल. म्हणजेच सन 2578 मध्ये हा योग असेल.

काशी हिंदू युनिवर्सिटीचे डॉ. गणेश प्रसाद मिश्रा यांनी सांगितले की, असे दुर्मिळ सुर्यग्रहण 296 वर्षांपुर्वी 7 जानेवारी 1723 मध्ये आला होता. पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, धून राशीमध्ये 6 ग्रहांच्या युतीसह सुर्यग्रहण होते. सुर्य, बुध, गुरू, शनी, चंद्र आणि केतू धून राशीत होते. आता असा योग्य थेट 559 वर्षानंतर 9 जानेवारी 2578 मध्ये येईल.

Leave a Comment