भीमा कोरेगाव प्रकरणात पुणे पोलीस घेणार ‘एफबीआय’ची मदत

Image Credited – The Intercept

भीमा-कोरेगाव प्रकरणातील एका तपासामध्ये पुणे पोलीस आता अमेरिकाच्या फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशनची (एफबीआय) मदत घेणार आहे. पोलिसांना आरोपी वरवर राव यांच्या घरातून एक हार्ड डिस्क मिळाली होती. या तुटलेल्या हार्ड डिस्कमधून डेटा पुन्हा मिळवण्यासाठी पोलीस एफबीआयची मदत घेणार आहे.

वरवर रावसह अन्य लोकांवर आरोप आहे की, भीमा कोरेगावमध्ये हिंसा भडकवण्यामध्ये त्यांची भूमिका आहे.

या प्रकरणात हार्ड डिस्कमधून काही पुरावे मिळू शकतात. यासाठी फॉरेंसिक तज्ञ आणि पोलिसांची एक टीम लवकरच अमेरिकेला जाणार आहे. पुणे पोलिसांनुसार, 31 डिसेंबर 2017 ला सीपीआयच्या (माओवादी) फंडद्वारे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जे सरकारला हटवण्यासाठी षढयंत्राचा एक भाग होते.

पोलिसांनी दावा केला आहे की, येथे देण्यात आलेल्या भडकाऊ भाषणांमुळे 1 जानेवारी 2018 ला कोरेगाव-भीमा येथे जातिवादी हिंसा भडकली होती. 6 जून 2018 नंतर पोलिसांनी सुधीर धावले, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत,पी वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरूण परेरा आणि वर्नन गोंसाल्वेज यांना अटक केले आहे.

Leave a Comment