अभिनंदन यांच्या सन्मानार्थ या कॅफेने बनवली चॉकलेटची मुर्ती

Image Credited – ANI

पुद्दुचेरीच्या एका कॅफेने भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या सन्मानार्थ त्यांचा चॉकलेट स्टॅच्यू (प्रतिमा) बनवला आहे. वर्ष 2009 ला सुरू झालेले हे कॅफे दरवर्षी प्रसिद्ध व्यक्तीचा स्टॅच्यू बनवून त्यांना सन्मान जाहीर करते. अभिनंदन यांची प्रतिमा पाच फूट 10 इंच लांब आहे व याचे वजन 321 किलो आहे. ही मुर्ती बनवण्यासाठी 132 तास लागले. याबाबतची माहिती कॅफेचे शेफ राजेंद्र तंगरसू यांनी दिली.

याआधी या कॅफेने महात्मा गांधी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, चार्ली चॅपलिन, रजनीकांत आणि क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीची देखील चॉकेलट मुर्ती बनवली आहे.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये बालाकोट एअर स्ट्राईकनंतर 24 फेब्रुवारीला पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला उत्तर देताना अभिनंदन मिग-21 विमानाने पाकिस्तानचे एफ-16 पाडले होते.

Leave a Comment