बँकेत दरोडा टाकून व्यक्तीने हवेत उडवले पैसे, दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा

Image Credited – NDTV

अमेरिकेच्या कोलोराडो येथे ख्रिसमसच्या दिवशी एका व्यक्तीने बँकेतून पैसे लुटून लोकांमध्ये वाटण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सांगितले की, दरोडा टाकल्यानंतर तो व्यक्ती बँकेतून बाहेर आला आणि पैसे रस्त्यावर हवेत फेकून लोकांना ते घेण्यासाठी सांगू लागला. सोबतच ओरडून रस्त्यावरील लोकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत होता.

पोलिसांनी आरोपी डेव्हिड वन ओलिवरला अटक केले आहे. त्याच्याकडे कोणतेही शस्त्र सापडले नाही. बँकेतील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, तो बँकेच्या आत आला आणि जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. त्यावेळी बँकेत जास्त गर्दी नव्हती. त्याने कॅशिअरला पैसे देण्यास सांगितले. दरोडेखोराने अद्याप किती पैसे घेतले हे अद्याप समजू शकले नाही.

रस्त्यावर चालणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, तो अचानक बँगेतून पैसे काढून फेकू लागला व जोरजोरात मेरी ख्रिसमस म्हणत होता. एका अधिकाऱ्याने सांगितले की, रस्त्यावरील व्यक्तींनी पडलेले पैसे बँकेला परत केले. मात्र हजारो डॉलर गायब झाल्याचे नाकरता येणार नाही.

Leave a Comment