आयसीसीची क्रमवारी म्हणजे ‘कचरा’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची टीका

Image Credited – DNA

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल अर्थात आयसीसी ही क्रिकेटच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवण्याचे, नियमावली तयार करण्याचे काम करत असते. आयसीसी जाहीर करत असलेली खेळाडूंची क्रमवारी देखील महत्त्वपुर्ण असते. ही कर्मवारी खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असते.

मात्र आता आयसीसीच्या या क्रमवारीवर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मायकल वॉनने आयसीसीची कसोटी क्रमवारी ही कचरा असल्याचे म्हटले आहे.

मायकल वॉनचे म्हणणे आहे की, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या संघांनी कसोटी क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केलेले नाही. त्यामुळे कसोटी क्रमवारीत हे दोन्ही संघ दुसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी पात्र नाहीत. मायकल वॉन म्हणाला की, मी आयसीसीच्या क्रमवारीबद्दल मी योग्य विचार करतो. मला वाटते की हे एकदम कचरा आहे. मला माहित नाही की न्यूझीलंडच्या संघाने मागील 2 वर्षात किती मालिका जिंकल्या आहेत, जे ते दुसऱ्या स्थानावर कायम आहेत.

वॉन म्हणाला की, इंग्लंडसाठी चौथे स्थान कसे योग्य असू शकते ? इंग्लंडने मागील 4 वर्षात कसोटी सामन्यात खासकरून परदेशात खूप संघर्ष केला आहे. त्यानंतर देखील आयसीसीने त्यांना चौथे स्थान दिले आहे. इंग्लंडने घरच्या मैदानावर मालिका जिंकल्या आहेत. काही दिवसांपुर्वीच अॅशेस मालिका ड्रॉ केली. त्यांनी केवळ आयर्लंडला हरवले आहे. त्यांची क्रमवारी विचार करण्यास भाग पाडते.

माझ्या दृष्टीने न्यूझीलंड क्रमांक -2 चा संघ नाही. मला वाटते की कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया सर्वोत्तम आहे, असेही तो म्हणाला. त्याने भारतीय संघाच्या क्रमवारीवर कोणतेही प्रश्न उपस्थित केले नाहीत.

Leave a Comment