मार्च 2020 पर्यंत प्रत्येक गावात मोफत वाय-फाय सेवा पोहचवणार सरकार

Image Credited – News On AIR

मार्च 2020 पर्यंत प्रत्येक गावात भारत नेट ऑप्टिग फायबरद्वारे मोफत वाय-फाय सेवा पुरवली जाणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे.

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, भारत नेटद्वारे याआधीच 1.3 लाख ग्रामपंचायतींना वाय-फायद्वारे जोडण्यात आलेले आहे. आमचे लक्ष 2.5 लाखांपर्यंत नेण्याचे आहे. भारत नेट सेवेचा वापर वाढवण्यासाठी मार्च 2020 पर्यंत प्रत्येक गावात मोफत वाय-फाय सेवा प्रदान केली जाईल.

ते म्हणाले की, या सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंत कमीत कमी 15 टक्के गावांना तरी डिजिटल हब म्हणून विकसित करायचे आहे. गावांचे सशक्तीकरणकरण्यात येत असून, डिजिटल सेवेमुळे अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यास देखील त्यांची मदत होईल.

कॉमन सर्व्हिस सेंटरचे सीईओ दिनेश त्यागी म्हणाले की, डिजिटल गाव उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांना शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक सेवा डिजिटल माध्यमातून पुरवून त्यांचे सशक्तीकरण करणे हा आहे. डिजिटल गावात पात्र व्यक्तीला डिजिटल शिक्षण दिले जाईल. युवक व विद्यार्थी शैक्षणिक आणि स्किल कोर्सची माहिती घेऊ शकतील. नागरिकांना आरोग्य सेवांचाही लाभ घेता येईल.

Leave a Comment