गांगुलीच्या मध्यस्थीमुळे बुमराहला मिळाला दिलासा

Image Credited – DNA India

गेल्या तीन महिन्यांपासून दुखापतीमुळे क्रिकेटपासून लांब असलेला भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमहार रणजी ट्रॉफीमध्ये गुजरातकडून खेळताना केरळविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता होती. मात्र आता जसप्रीत बुमराह रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

जसप्रीत बुमराहला क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी अधिक वेळ हवा आहे. त्याला फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आता गोलंदाजी करायची नाही. याविषयी त्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगली आणि सचिव जय शाह यांच्याशी देखील चर्चा केली. त्यांनी बुमराहला केवळ पांढऱ्या चेंडूवर खेळण्यास सांगितले आहे. कारण भारतीय संघाला कसोटी क्रिकेट खेळण्यास अद्याप वेळ असून, संघ पुढील महिन्यात टी20 आणि एकदिवसीय मालिकेमध्ये खेळणार आहे.

गुजरात संघाचा कर्णधार पार्थिव पटेलने देखील बुमराह सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय निवड समितीने गुजरात संघाच्या व्यवस्थापनाला सांगितले होते की, बुमराह दुखापतीमधून परतत असल्याने त्याला सामन्यादरम्यान दिवसाला केवळ 4 ते 8 ओव्हरच टाकू द्याव्यात. मात्र दिवसाला केवळ 8 ओव्हरच टाकणारा खेळाडू नको होता.

यानंतर गांगुलीने नियम बाजूला ठेवत विश्रांती करण्यास सांगितले आहे. आता बुमराह थेट श्रीलकेंविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यातच पदार्पण करेल.

पुढील मालिका ही टी20 सामन्यांची असल्याने बुमराहने रणजी स्पर्धेत पुर्ण दिवस गोलंदाजी करणे हे संघ व्यवस्थापनाला देखील मान्य नव्हते. भारत पुढील कसोटी क्रिकेट स्पर्धा थेट फेब्रुवारीमध्ये खेळणार आहे.

Leave a Comment