या विमानतळावर अशी गोष्ट आहे ज्याची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही

Image Credited – Indiatimes

जेव्हाही कधी जगातील सर्वोत्तम विमानतळाचा विषय येतो, तेव्हा सर्वात प्रथम सिंगापूरच्या चांगी विमानतळाचे येते. हे विमानतळ आपली सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षेसाठी प्रसिद्ध आहे. सुंदरतेमध्ये देखील हे विमानतळ टॉपवर आहे. मात्र या विमानतळावर असेही काही आहे ज्याच्याबद्दल आपण विचारच करू शकत नाही.

विमानतळावर प्रवाशांचे अनुभव मजेशीर बनवण्यासाठी अनेक गोष्टी असतात. जबरदस्त पार्किंग, फाउंटेन, बाजार अशा अनेक गोष्टी आहेत. अनेकदा प्रवाशांची बोर्डिंगविषयी तक्रार असते. रांगेत उभे राहून सामान ठेवणे आणि बोर्डिंग गेटकडे जाणे या गोष्टी कंटाळवाण्या वाटतात. मात्र चांगी विमानतळावर ही गोष्ट देखील मजेदार बनवण्यात आली आहे.

Image Credited -Navbharattimes

चांगी विमानतळावर एक स्लाईड ट्यूब लावण्यात आली आहे. लहान मुले खेळतात त्यासारख्याच स्लाईडप्रमाणे आहे. तुम्ही विचार करत असाल विमानतळावर या स्लाईडचे काय काम ? तर ही स्लाईड ट्यूब बोर्डिंग पॉईंटवरून थेट गेटपर्यंत घेऊन जाते.

प्रवाशांचे स्लाईडिंगचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. विमानतळाच्या टर्मिनल-4 वर मल्टी स्टोरी स्लाईड ट्यूब लावण्यात आली आहे. ही स्लाईट ट्यूब खूप वेगाने प्रवाशाला गेटपर्यंत घेऊन जाते.

Leave a Comment