दयाळू लोक जगतात अधिक आयुष्य, संशोधकांचा दावा

Image Credited – Steemit

कॅलिफोर्निया युनिवर्सिटी, लॉस एंजिल्सच्याच्या ‘बेडारी काइंडनेस इंस्टिट्यूट’च्या संशोधकांनी दावा केला आहे की, जर तुम्ही दयाळू असाल तर तुमचे आयुष्य मोठे असू शकते. मदत करणे, चांगले वागणे या भावना तुम्हाला आनंद देतात आणि हाच आनंद तुम्हाला अनेक आजारापासून वाचवतो.

या संस्थेचे संचालक डॅनियल फेस्लर यांनी सांगितले की, संशोधनात हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे की तुमचा दयाळूपणा बघून दुसरे लोक कशाप्रकारे दयाळू बनण्यासाठी प्रेरित होत आहेत. आपण एका निर्दयी जगात जगतोय, असे म्हणणे योग्य ठरेल. या संशोधनात वैज्ञानिक दृष्टीकोनासोबतच मनोवैज्ञानिक, जैव विज्ञानामधील सकारात्मक सामाजिक सहभागिता सारखे विषय देखील आहेत.

कोलंबिया युनिवर्सिटीच्या डॉक्टर केली हार्डिंग यांनी सांगितले की, दयाळू असणे रोगप्रतिकारकशक्ती, ब्ल्ड प्रेशर सामान्य ठेवण्यास मदत करते. हे लोकांना अधिक काळ जिवित ठेवण्यासोबत आरोग्य देखील चांगले ठेवते. सर्वात चांगले गोष्ट म्हणजे हे सर्व मोफत मिळते.

द रॅबिट इफेक्ट या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे की, शाळा आणि घरी दयाळू राहण्याचे अनेक चांगले परिणाम होतात. मेडिकल क्षेत्रात हे तंत्र फायदेशीर ठरू शकते. मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य यात संबंध असणे गरजेचे आहे.

या युनिवर्सिटीमध्ये मनोवैज्ञानिक शोध घेत आहेत की, निर्दयी व्यवहार करणाऱ्यांना दयाळू कसे करता येईल ? दोन लोकांमधील दयाळूपणा कसा वाढवता येईल ? नवनवीन शोधासाठी या संस्थेला ‘बेडारी फाउंडेशन’कडून 2 कोटी अमेरिकन डॉलरची मदत मिळालेली आहे.

Leave a Comment