भारताकडून पाक खरेदी करणार पोलिओचे मार्कर्स

Image Credited – Dawn

चीनच्या पोलिओ मार्कर्सच्या गुणवत्तेमुळे नाखूष पाकिस्तान सरकार आता हे मार्कर्स भारताकडून खरेदी करणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकने भारताशी व्यापार संबंध थांबवले होते. मात्र आता औषध व्यापारावरील बंदी हटवण्यात आली आहे.

पोलिओ मार्कर्सचा उपयोग बाळांना औषध पाजल्यानंतर बोटावर निशाण लावण्यासाठी केला जातो. डब्ल्यूएचओने केवळ भारत आणि चीनच्या पोलिओ मार्कर्सच्या उत्पादनांना अधिकृत केले आहे.

व्यापार बंदी आधी पाकने भारताकडून 80 हजार मार्कर्स खरेदी करण्याचा करार केला होता. मात्र बंदीनंतर चीनकडून मार्कर्स खरेदी करावे लागले होते. पाकिस्तानचे पोलिओ निर्मूलन अभियानेच प्रमुख राणा सफदर यांच्यानुसार, चीनी मार्कर्स महाग तर होतेच त्याचबरोबर त्याची गुणवत्ता देखील चांगली नव्हती. अनेकदा लहान मुले मार्कर लावलेले बोट तोंडात घालतात. भारतीय मार्कर हे नॉन टॉक्सिक आहेत. चीनी उत्पादनामध्ये तसे नाही.

जगात केवळ 3 देशांमधूनच पोलिओचे निर्मुलन झालेले नाही. यामध्ये पाकिस्तान, नायजेरिया आणि अफगाणिस्तान या देशांचा समावेश आहे.

Leave a Comment