जल नियोजनासाठी मोदींनी आणली अटल भूजल योजना

Image Credited – India TV

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने पंतप्रधान मोदींनी आज वाजपेयी यांच्या नावाने अटल भूजन योजनेचा शुभारंभ केला. या योजनेद्वारे भूजल स्तर वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. भूजल पाण्याचा स्तर घटत असल्याचे देखील ते यावेळी मोदी म्हणाले. याशिवात रोहतंग येथील बोगद्याला देखील वाजपेयी यांचे नाव देण्यात आलेले आहे.

यावेळी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, ज्या पिकांना कमी पाणी लागते अशा पिकांचे उत्पादन करा. तसेच दैनंदिन कामासाठी पाण्याचा वापर कमी करा व पाणी वाचवा.

याशिवाय नवीन स्टार्टअपला त्यांनी आवाहन केले की, विविध गोष्टींसाठी कमी पाण्याचा वापर करता येईल अशी टेक्नोलॉजी शोधा असेही ते म्हणाले.

18 कोटी ग्रामीण कुटूंबापैकी केवळ 3 कोटींनाच स्वच्छ पाणी मिळते. पुढील 5 वर्षात इतर 15 कोटी कुटूंबाना देखील स्वच्छ व पाईपलाईनद्वारे पाणी पोहचवण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Leave a Comment