अरेच्चा ! या 10 हजार वर्ष जुन्या गुहेत आजही राहतात लोक

Image Credited -Amarujala

इराण हा पर्वतरांगा आणि डोंगर अशी नैसर्गिक सुंदरता असलेला देश आहे. येथील लोकसंख्येतील मोठा हिस्सा मैदानी प्रदेशात राहतो. मात्र काही असेही आहेत जे गुहेत राहतात.

इराणमधील मेमंद नावाचे गाव राजधानी तेहरानपासून 900 किमी दूर आहे. येथील गावाची लोकसंख्या थोडीच आहेत. येथील लोक पर्वतांवरील गुहेत राहतात. दगडांना कापून त्यांना बनवण्यात आले आहे. या गुहेतील नकक्षी काम बघून या गुहा जवळपास 10 हजार वर्ष जुन्या असण्याची शक्यता आहे. यूनेस्कोने या भागाला जागतिक वारसा यादीत समावेश केले आहे.

Image Credited -Amarujala

हवामानानुसार येथील लोक गुहेत जाऊन राहतात. गर्मीमध्ये लोक पेंढ्याचे छत बनवून पर्वतांवर राहतात. तर थंडीमध्ये लोक गुहेत जाऊन राहतात.

विश्लेषकांचे म्हणणे आहे की, जवळपास 10 हजार वर्षांपुर्वी पर्वतांना कापून 400 गुहा बनवण्यात आल्या होत्या. त्यातील केवळ 90 शिल्लक आहेत. गुहेत बनलेल्या या घरांमध्ये 7 खोल्या आहेत. यांची लांबी 2 मीटर आणि रुंदी 20 वर्ग मीटर असते. काही खोल्या कमी रुंदी व कमी उंचीच्या देखील आहेत. येथे सध्या राहणाऱ्या लोकांनी या गुहा पुर्णपणे बदलून टाकल्या आहेत. आज येथे प्रत्येक प्रकारची सुविधा आहे.

Image Credited -Amarujala

येथे वीज देखील आहे. त्यामुळे फ्रीज, टिव्ही अशा गोष्टींचा देखील वापर होतो. पाणी देखील येथे भरपूर आहे. केवळ हवा येथील घरांमध्ये पोहचत नाही. येथील अनेक लोक पारसी समाजाचे आहेत.

Image Credited -Amarujala

पारसी धर्म इराणच्या सर्वात जुन्या धर्मापैकी एक आहे. किचन दोबांदी अशीच एक गुहा आहे, ही गुहा पारशी लोकांचे मंदिर असल्याचे सांगितले जाते. मात्र 7व्या शतकात इस्लामच्या प्रसारानंतर त्याचे निशाण संपुष्टात आले. अशाच अनेक गुहा मस्जिदीमध्ये बदलल्या आहेत.

Image Credited -Amarujala

येथील अधिकतर लोक शेतकरी आहेत. याशिवाय ते प्राण्यांना डोंगरांवर चरण्यासाठी नेतात. पर्वतांवर औषधं देखील जमा करतात. आता लोक या गुहेत राहण्यास टाळाटाळ करतात. गुहेत राहण्याच्या ऐवजी ते आजुबाजूच्या शहरात राहण्यास गेले आहेत. केवळ 150 लोकच पुर्ण वर्ष येथे राहतात.

Image Credited -Amarujala

कमी लोकसंख्येमुळे हा प्रदेश स्वतःचे अस्तित्व गमवत आहे. याला वाचवण्यासाठी इराणच्या हेरिटेज हँडिक्राफ्ट अँन्ड टूरिज्म ऑर्गेनाइजेशनने जागृकता मोहिम देखील चालवली होती. त्यानंतर येथे लोकांचे येणे वाढले आहे. हा प्रदेश पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

Leave a Comment