औषधांची चुकीची जाहिरात दिल्यास दाखल होणार गुन्हा

Image Credited – Marketing Land

आपल्या औषधांचा वाढून प्रचार करणाऱ्या कंपन्यांना लवकरच दंड आणि फौजदारी खटल्यांचा सामना करावा लागणार आहे.  यामध्ये खास करून अशा कंपन्या ज्या आपल्या औषधांद्वारे यौन अंगाची वाढ, स्तनाचा आकार आणि गोरेपणा असे खोटे दावे करतात.

आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्याच्या कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी एक कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. फार्मास्यूटिकल्स कंपन्या भ्रामक जाहिरातींद्वारे आपल्या औषधांबद्दल खोटी माहिती देतात. यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येते. त्यांनी सांगितले की, अशा कंपन्यांना भ्रामक जाहिरातींपासून रोखण्यासाठी त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे, वरिष्ठ मॅनेजरला जेलमध्ये पाठवणे आणि दंड ठोठवणे अशा शिफारसी केल्या जाऊ शकतात.

समितीच्या एका सदस्याने सांगितले की, कायद्यामध्ये सध्या दंडाचे जे प्रावधान आहे ते कंपन्यांना खोटे दावे करण्यापासून रोखण्यास असमर्थ आहेत. खोटे दावे करणाऱ्यांना आता केवळ 500 रुपयांचा किरकोळ दंड देऊन वाचतात.

कमिटी ड्रग्स अँन्ड कॉस्मेटिक्स नियम 1945 च्या परिशिष्ठ ‘जे’ मध्ये समाविष्ट आजारांसाठी जाहिरात देणाऱ्यांच्या विरोधात कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा विचार करत आहे. या आजारांध्ये कॅन्सर, भ्रूणसाठी लिंग परिवर्तन, गोरेपणा, यौन सुखासाठी मनुष्याची क्षमता वाढवणे, शीघ्रपतन, केस पांढरे होणे, स्तनाचा आकार आणि रूप यासारखे दावे करणारे जाहिराती करता येत नाही.

सध्या पहिल्यांदा चुकीचा दावा केल्यास 6 महिन्यांपर्यंतचा कारावास अथवा दंड अथवा दोन्ही आणि दुसऱ्यांदा चुक केल्यास शिक्षा 1 वर्षांची होऊ शकते. यात बदल करणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्याच्या कायद्यात केवळ वृत्तपत्रातील आरोग्यासंबंधित खोटे दावे रोखले जाऊ शकतात. टिव्ही आणि इंटरनेटवरील खोटे दावे रोखण्यासाठी कोणतेही नियम नाहीत.

Leave a Comment