126 कोटींच्या यमुना एक्सप्रेस वे जमीन घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे

Image Credited – India Today

यमुना एक्सप्रेस वे प्राधिकरण घोटाळ्याचा तपास सीबीआयने आपल्या हातात घेतला आहे. तपास एंजेंसीने आपल्या एफआयआरमध्ये प्राधिकरणाचे माजी सीईओ पीसी गुप्ता आणि 20 जणांचे नाव आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. उत्तर प्रदेश सरकारच्या शिफारसीनंतर एजेंसीने 126 कोटी रुपयांच्या जमीन घोटळ्याचा तपास आपल्या हातात घेतला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने जुलै 2018 मध्ये या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. आरोप आहे की, यमुना एक्सप्रेस इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटीचे सीईओ गुप्ताने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत मिळून मथूरा येथील 7 गावातील 19 कंपन्यांच्या मदतीने 85.49 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली होती. त्यानंतर प्राधिकरणाला ही जमीन अधिक किंमतीत विकली. त्यामुळे 126 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

या जमीन खरेदी घोटाळ्यात पोलिसांनी काही दिवसांपुर्वीच बुलंदशहर येथून अजीत नावाच्या आरोपीला अटक केले होते. तपासात समोर आले की, अजीत प्राधिकरणाचे तत्कालिन ओएसडीचा नातेवाईक आहे. या प्रकरणात प्राधिकरणाचे सीईओ पीसी गुप्ता जेलमध्ये आहेत. 15 डिसेंबरला तत्कालिन एसीईओ सतीश कुमारला पोलिसांनी अटक केले होते.

Leave a Comment