या पठ्ठ्याने थेट तीनचाकी रिक्षावरच बांधले घर

Image Credited – Amarujala

परदेशात फिरण्याची आवड असणारे मोटरहोम्स, कॅपर व्हॅनचा वापर करत असतात. यामध्ये कार अथवा ट्रकला घरात बदलण्यात आलेले असते. मात्र तुम्ही कधी तीन चाकी वाहनाला घरात बदलल्याचे पाहिले आहे का ? मात्र बंगळुरू येथील एका युवकाने जुगाड करून थेट तीनचाकी वाहनाला घरात बदलले आहे.

23 वर्षीय युवक पीआर अरूण प्रभूने बजाज आरई थ्री-व्हिलर पिकअपला टेंटहाऊसमध्ये बदलले आहे. तामिळनाडूच्या नमक्कलमधील पारामथी वेल्लोर येथे राहणाऱ्या अरूणने नवीन कॉन्सेप्ट होम ऑन व्हिल्स प्रोजेक्ट सत्यात उतरवला आहे.

Image Credited – Amarujala

बंगळुरूची डिझाईन आणि आर्किटेक्ट कंपनी बिलबोर्ड्सशी जोडलेले अरूणने आपल्या प्रतिभेने सर्वांनाच हैराण केले आहे. त्याने जवळपास 5 महिने लाखो रुपये खर्च केले आहेत.

Image Credited – Amarujala

आतापर्यंत होम ऑन व्हिल्सचा ट्रेंड केवळ चारचाकी वाहनांवरच केला जात असे. मात्र अरूणने तीनचाकी वाहनावर हा प्रयोग करून दाखवला आहे. मात्र तीनचाकी वाहनावरील घरात स्थिरता, जागा देखील कमी आहे.

Image Credited – Amarujala

जुन्या बजाज तीनचाकीवर अरूणने बसच्या बेसिक फ्रेमचा वापर केला आहे. फिरण्याची आवड असलेली व्यक्तीला लांब प्रवासादरम्यान आराम करण्यासाठी खाज जागा बनवण्याचा उद्देश अरूणचा होता.

Image Credited – Amarujala

त्याने तीनचाकी घरात बेडरूम, बाथरूम, किचन, वर्कस्पेस, वॉटर हीटर आणि टॉयलेट बनवले आहे. त्यांच्या घरात 250 लीटरचा वॉटर टँकर, 600 वॉटचा सोलर पॅनल आणि बॅटरी, कपबोर्ड्स, बाहेर कपडे सुकवण्यासाठी हँगर, दरवाजे आणि शिडी आहे.

कॅबिनच्या वरीत 6 फूटाची छत्री देखील लावली आहे. त्याच्या खाली खुर्चीवर बसून आराम करता येतो.

Leave a Comment