शिवसेना मंत्र्यांच्या केबिनमध्ये आदित्य ठाकरे यांचाही फोटो


महाआघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांनी हाती घेतल्यानंतर मंत्रीगणांच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरला असतानाच शिवसेना मंत्र्यांनी त्यांच्या केबिन मध्ये बाळासाहेब, उध्दवजी यांच्याबरोबर आदित्य ठाकरे यांचाही फोटो लागला आहे. या निमित्ताने आदित्य मंत्री बनले नसले तरी सरकारातील त्यांचे महत्व अधोरेखित झाले आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्या केबिन मध्ये बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीने आदित्य यांचाही फोटो लावला आहे.

शिवसेनेच्या अन्य एका ज्येष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार आदित्य यांच्यावर सरकारी कामाची कोणतीही जबाबदारी अजून दिली गेलेली नसली तरी धोरण आखणीत त्यांचा निर्णय आणि भूमिका अंतिम राहील. मंत्री एकनाथ शिंदे यांच्याही केबिन मध्ये ठाकरे परिवारातील या नेत्यांचे फोटो लावले जाणार आहेत. शिवाय मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिवसेनेचे जे नवे मंत्री बनतील त्यांच्याही केबिन मध्ये असे फोटो लावले जातील. ते आमचे नेते आहेत आणि त्याचे फोटो लावण्यात काहीही गैर नही. मंत्र्यांच्या केबिन मध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे फोटो लावणे बंधनकारक आहे. काही जण मुख्यमंत्र्यांचे फोटोही लावतात.

बीजेपी शिवसेना युती सरकार सत्तेवर होते तेव्हाही शिवसेना मंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर उद्धव ठाकरे यांचाही फोटो केबिन मध्ये लावला होता आणि तेव्हाही तो वादविवादाचा विषय बनला होता असेही समजते.

Leave a Comment