५ जानेवारीपर्यंत आयुष्मान खुराणा नॉट रिचेबल


बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराणा याच्यासाठी २०१९ साल खुपच बहारदार ठरले आहे. त्याचे आर्टिकल १५, ड्रीम गर्ल आणि बाला या चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला शिवाय त्याला अंदाधून साठी उत्तम अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या साऱ्या घाईगर्दीत आयुष्मान त्याच्या कुटुंबाला अजिबात वेळ देऊ शकला नव्हता. त्याची भरपाई करण्यासाठी तो नाताळ आणि नवीन वर्ष अमेरिकेत साजरे करणार असून ५ जानेवारीपर्यंत तो या काळात बाकीच्या लोकांसाठी नॉट रिचेबल असेल असे समजते.

आयुष्मान साठी नवीन वर्ष सुद्धा घाईगर्दीचे आहे. त्यामुळे पुढील वर्षात सुद्धा तो पत्नी ताहीरा आणि दोन मुले याना पुरेसा वेळ देऊ शकणार नाही हे लक्षात घेऊन तो कुटुंबाला आत्ताच वेळ देत आहे. कुटुंबासोबत वेळ काढल्याने आयुष्मानची बॅटरी चार्ज होणार आहे. ५ जानेवारीला तो सुट्टी संपवून भारतात परतेल. पुढील वर्षात त्याचे शुभमंगल जादा सावधान आणि गुलाबो सिताबो असे दोन चित्रपट येणार असून तो २० ब्रांडसाठी जाहिराती शुटींग करणार आहे.

Leave a Comment