रहस्यमयी वांगाची भविष्यवाणी, पुतीन, ट्रम्प याना नववर्ष खराब


सोर्स इंडिया टाईम्स
नवीन वर्ष सुरु होण्यास आता मोजके दिवस राहिले आहेत. नवीन वर्ष आपल्यासाठी कसे असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. भविष्य किती खरे आणि किती खोटे हा वादाचा विषय असला तरी भविष्यावर विश्वास ठेवायचा असे ठरविले तर २०२० अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि युरोपसाठी चांगले नाही. हे भविष्य वर्तविले आहे बुल्गेरीयाची रहस्यमयी अंध भविष्यवेत्ति बाबा वांग हिने.

बाबा वांग हिचा १९९६ मध्ये म्हातारपणामुळे मृत्यू झाला आहे. मात्र तिने अगोदरच ५०७९ सालापर्यंतची भविष्ये सांगून ठेवली आहेत. वांग अंध होती. तिने अमेरिकेवर झालेल्या ९/११ हल्ल्याचे भविष्य अगोदरच वर्तविले होते. डेली मेलच्या रिपोर्टनुसार तिची काही भविष्ये तंतोतंत खरी ठरली. त्यातही विनाशाची जी भविष्ये तिने वर्तविली ती बरोबर होती.

तिच्या भविष्यवाणीनुसार २०२० मध्ये ट्रम्प याना ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता असून त्यात त्यांचे कान बहिरे होतील व कदाचित त्यांच्या मृत्यू ओढवेल. तसेच रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे सहकारी त्यांच्याविरोधात कटकारस्थान रचतील आणि पुतीन यांच्या हत्येचा प्रयत्न होईल. युरोप खंडावर मुस्लीम अतिरेकी रासायनिक हल्ला चढवतील.

बाबा वांगा हिने अमेरिकेच्या ट्रेड सेंटरवरील हल्ल्याचे भविष्य १९८९ साली वर्तविले होते तसेच रशियन पाणबुडी कुर्गची जलसमाधी, आयएसआयएसचा उदय, अमेरिकेचा ४४ वा अध्यक्ष आफ्रिकन वंशाचा असेल (बराक ओबामा) अशी भाकिते खरी ठरली होती. २०१६ मध्ये युरोपचे अस्तित्व नष्ट होईल असेही तिचे भाकीत होते. त्यातील तथ्य शोधायचे तर ब्रिटनने ब्रेग्झीट मधून बाहेर पडण्याचा निर्णय याच साली घेतला होता.

Leave a Comment