जगभरात नाताळाचा उत्साह

chrismas
बेथेलेहम – आज जगभरात येशू ख्रिस्तांचा जन्मदिन नाताळ म्हणून साजरा करण्यात येत आहे. बेथलेहम ते बंगळुरूपर्यंत ख्रिसमसची धूम पाहायला मिळत असून सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. बेथेलेहम येथे पारंपरिकतेनुसार येशूंचे जन्मस्थान मानण्यात येते. बेथेलेहम येथे जगभरातून ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत. मात्र, इस्रायली पॅलेस्टिनी हिंसाचाराचा परिणाम दिसून येत आहे.

इस्रायलविरोधातील हल्ल्यांमध्ये सहभागी असलेले तीन पॅलिस्टिनी पश्चिम सिमारेषेवर ख्रिसमसपूर्व आयोजनाच्या अगोदरच ठार मारण्यात आले. दरम्यान, बेथेहेलम हे इस्रायली लष्कर आणि पॅलिस्टिनी आंदोलकांमधील संघर्षाचे केंद्रबिंदू बनले आहे. येथील मैंगर स्वायर येथे दरवर्षी जल्लोषात नाताळ साजरा करण्यात येतो. यंदाही येथे ख्रिसमसची जोरदार धूम पाहायला मिळते. मात्र, इतर काही ठिकाणी हिंसेच्या कारणामुळे नाताळाचा उत्सव मावळला आहे. अमेरिका, ब्रिटेन, फ्रांस, रुस, चीन, जपानपासून ते श्रीलंकेपर्यंत ख्रिसमस धूमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन देशवासियांना आणि जगभरातील नागरिकांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment