ख्रिसमसनिमित्त भारतासह जगभरात रोषणाईने सजली विविध शहरे

xmas
मुंबई – जगभर ख्रिसमस आणि भारतात नाताळ म्हणून येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस हा साजरा करण्यात येतो. भारतासह जगभरामध्ये त्यानिमित्ताने ख्रिसमसची धूम सुरू झाली आहे. मुंबई, दिल्ली आणि कोलकातामध्ये देखील ख्रिसमसचा जल्लोष सुरु झाला आहे. जिंगल बेल्स, जिंगल बेल्सची धून, केक, भेटवस्तू असे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते आहे.

मुंबईतील ख्रिस्ती बांधवांनी विविध चर्चमध्ये प्रार्थना केली. मुंबईतील वांद्रे, माहिम चर्चमध्ये ख्रिसमसनिमित्त विशेष ख्रिसमस ट्री, चांदण्या आणि बेल्सची मनमोहक सजावट पाहायला मिळत आहे. मुंबईतील वसईतही नाताळाची धूम पाहायला मिळत आहे. वसईत रात्री प्रभू येशूंच्या आगमनाची प्रार्थना करण्यात आली. पहिला मिसा १० वाजता झाला तर दुसरा मिसा हा ११ वाजता झाला. वसईतील गावे ही सध्या मनमोहक रोषनाईने सजली आहेत.

चर्चमध्ये मध्यरात्री पवित्र मिस्सा पार पडला. वेटीकन सिटीतही विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोप फ्रान्सिस यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर गोव्यासह संपूर्ण देशात ख्रिसमसचा उत्साह पाहयला मिळाला. ख्रिसमस निमित्ताने सँटा क्लॉज लहानग्यांना गिफ्ट वाटताना दिसत होते. या सणानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रपतींनी प्रभू येशूने सांगितलेल्या मानवतेच्या मार्गावर आपल्याला प्रेरीत होऊन जाण्याची गरज असल्याचे सांगितले.

Leave a Comment