तुम्ही पाहिले का 175 वर्षांपुर्वीचे जगातील पहिले ख्रिसमस कार्ड ?

जगातील पहिले छापील ख्रिसमस  कार्डला लंडनच्या चार्ल्स डिंकेस म्युझियममध्ये प्रदर्शनसाठी ठेवण्यात आले आहे. हे कार्ड 1843 मध्ये छापण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याच वर्षी चार्ल्स डिंकेसचे ए ख्रिसमस  कॅरल पुस्तक देखील छापले होते. तेव्हा या सारखे 1000 कार्ड छापण्यात आले होते, मात्र आता केवळ 21 कार्डच शिल्लक आहेत.

या कार्डला हेनरी कोलने डिझाईन केले होते. ते एक ब्रिटिश सिव्हिल अधिकारी होते. कार्डला इलस्ट्रेशन जॉन सी. हॉर्सलीने तयार केले होते. हाताने रंगवलेल्या या कार्डावर एका कुटूंबाचे चित्र होते. जे टेबलवर बसून वाईन पित आनंद साजरा करा करत आहेत. या कार्डवर ‘तुम्हाला ख्रिसमस  आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा’ असा संदेश लिहिलेला आहे.

म्यूझियममध्ये जे कार्ड ठेवण्यात आलेले आहे. ते एका मुलाने आपल्या आई-वडिलांना पाठवलेले आहे. या प्रिंट्स कार्डना सुरूवातीला विकण्यात आले, तेव्हा ते यशस्वी ठरले नाही. तेव्हा या कार्ड्सची किंमत 1 शिलिंग होती.

ख्रिसमस ला कार्ड पाठवण्यास मोठ्या प्रमाणात सुरूवात 1877 पासून झाली. त्यावर्षी 45 लाख कार्ड्स विकले गेले होते. आजच्या काळात ख्रिसमस  कार्ड देणे एक परंपराच झाली आहे. या कार्डला म्युझियममध्ये ‘ब्‍यूटीफुल बुक्‍स: डिकेंस अँन्ड द बिझनेस ऑफ ख्रिसमस ’ या नावाने प्रदर्शित करण्यात आले असून, एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहिल.

 

Leave a Comment