इमोजीच्या माध्यमातून होत आहे इजिप्तचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न

(Source)

इतिहासाचील अनेक गोष्टी आजही आपल्याला माहिती नाहीत. कारण भाषा आणि लिपीचे अनेक रहस्य अद्याप उलगडलेले नाहीत. इस्त्रायलच्या म्यूझियममध्ये मिस्त्रच्या (इजिप्त) इतिहासातील अद्याप न उलगडलेली रहस्य इमोजीद्वारे सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. इस्त्रायलच्या म्यूझियममध्ये या आठवड्यात खास ‘इमोजीलिफ्स’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे सध्या वापरात असलेले इमोजी आणि इजिप्तच्या सभ्येतमधील समानतेला समजले जाईल.

या प्रदर्शनाचे संचालक शर्ली बेन-डोर एव्हियन म्हणाले की, चित्रलिपींद्वारे तत्कालिन इतिहास समजणे मला अवघड जाते. तेव्हा मला लक्षात आले की, सध्या आपण आपले भावना दर्शवण्यासाठी फोटो अथवा इमोजीचा खूप वापर करतो. काही इमोजी अशा आहेत, ज्या चित्रलिपींशी खूप समान आहेत.

एव्हियन यांच्यानुसार, मनुष्याच्या मूळ भावना व्यक्त करण्यासाठी काही गोष्टी नेहमीच समान असतात. सध्याच्या काळात डान्ससाठी हात वरती करून नाचणाऱ्या इमोजीचा प्रयोग केला जातो. तसाच प्रयोग 3000 वर्षांपुर्वी चित्रलिपीमध्ये देखील होत असे.

त्यांनी सांगितले की, हजारो वर्षांचा फरक आणि सांस्कृतिक पद्धतीने वेगळा समाज असताना देखील काही चित्रलिपी आणि इमोजीमध्ये समानता आहे. प्राचीन गोष्टींना आपण प्रासंगिक सांगून नवीन पिढीशी जोडत असतो.

Leave a Comment