धक्कादायक! भारतात दर सात माणसांमध्ये एकजण मनोरुग्ण


नवी दिल्ली : आपल्या देशात दर सात माणसांमध्ये एकजण मानसिक रुग्ण असल्याची धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली आहे. ही धक्कादायक माहिती आरोग्य क्षेत्रातील आघाडीच्या लॅन्सेट या मॅगेझिनच्या सोमवारच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या अहवालातून समोर आली आहे. गेल्या १९९० ते २०१७ या काळात मानसिक रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे.

मानसिक रोगींची संख्या महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात सर्वाधिक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशातील एकूण महिलांपैकी ३.७ टक्के महिला नैराश्याला बळी पडत असून नैराश्याचे पुरुषांमध्ये प्रमाण २.७ टक्के असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

लॅन्सेट या मॅगेझिनने याआधी अहवालातून आणखी एक धक्कादायक बाब उघड केली होती. प्रदूषणाच्या बाबतीतभारत सर्वात वरच्या स्थानी असल्याचे अहवालात सांगण्यात आले होते. सध्याच्या आकडीवारीच्या आधारे, भारतात २३.२६ लाख लोकांचा २०१७ मध्ये प्रदूषणामुळे अकाली मृत्यू झाल्याची माहिती या अहवालातून समोर आली. भारताची प्रदूषणाच्या विविध पातळ्यांवर स्थिती सर्वात खराब असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment