खोल समुद्रात सापडला पंखांचा पायाप्रमाणे वापर करणारा दुर्मिळ मासा

Image Credited – dailymail

वैज्ञानिकांना टॉर्टुगेज द्वीपाजवळ मॅक्सिकोच्या खाडीत समुद्र सपाटीपासून 3000 फूट खाली 50 किलोंचा दुर्मिळ मासा सापडला आहे. हा मासा आपल्या पंखांचा पायाप्रमाणे वापर करतो. नॅशनल ऑसेनिक अँन्ड एटमॉसफेरिक अॅडमिनिस्ट्रेंशनला एक वर्षांच्या अभियानानंतर हे यश मिळाले आहे.

या माशाला ‘शेफर्स एंग्लरफिश’ असे नाव देण्यात आलेले आहे. याची त्वचा जाड आहे. हा मासा आपल्या समान माशांचीच शिकार करतो. या माशाला सर्वात प्रथम 1976 मध्ये कोलंबियन तटाजवळ कॅरिबयन समुद्रात पाहण्यात आले होते. या क्षेत्रातील भूगर्भीय विशेषतांमुळे जीवांची संख्या खूप कमी आहे. या माशाविषयी डेटा जमा करण्यात येत असून, जेणेकरून खोल समुद्रातील जीव त्यांच्या आवासाविषयी माहिती मिळू शकेल.

नॅशनल जिओग्राफीने या माशाविषयी सांगितले की, गडद अंधारात समुद्र तळावर एकटा राहणारा हा मासा पृथ्वीवरील सर्वात कुरूप जीव असू शकतो. या माशाचे फुटेज घेण्यासाठी पाण्यामध्ये रिमोटच्या मदतीने चालणाऱ्या व्हिकल आरओव्हीचा वापर करण्यात आला.

Leave a Comment