स्थलांतरीत लोकांसाठी पंतप्रधान हे देवाप्रमाणेच – शिवराज सिंह चौहान


जयपूर – धर्माच्या आधारावर ज्यांचा पाकिस्तानमध्ये छळ होत आला आहे, अशा स्थलांतरीत लोकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाप्रमाणेच असल्याचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. सोमवारी राजस्थानमधील एका कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले शिवराज सिंह चौहान हे बोलत होते.

भारतात राहणारे ते स्थलांतरीत, पाकिस्तानमधील जीवन हे ज्यांच्यासाठी अस्थिर आणि असुरक्षित होते. जे म्हणत की आम्ही येथेच मरू पण पाकिस्तानमध्ये परत जाणार नाही, नरेंद्र मोदी हे त्यांच्यासाठी देवाप्रमाणे अवतरले आहेत. मोदींनी त्या लोकांना नवजीवन दिले असल्याचे ते नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत बोलताना म्हणाले.

सीएए मुद्यावरून काँग्रेस हे जनतेची दिशाभूल करत असून टीव्हीवरून व्हिडिओ संदेश देण्याऐवजी, संसदेमध्ये कॅब पारित होण्याआधीच्या चर्चेमध्ये याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलायला हवे होते, अशी टीकाही शिवराज यांनी काँग्रेसवर केली. तुम्ही कधी भारतातील स्थलांतरीत लोकांची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न तरी केला आहे का? असे म्हणत त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला.

Leave a Comment