90 वर्ष जुन्या झाडाची साल काढणाऱ्याला लाखोंचा दंड

Image Credited – dailymail

लंडन येथील एस्सेक्स येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला झाड कापल्याच्या आरोपाखाली 55 लाख रुपयांचा (60 हजार पाउंड) दंड ठोठवण्यात आला आहे. स्टीफन लॅरेंस या व्यक्तीने झाड कापण्यासाठी स्थानिक प्रशासनाला दोन अर्ज केले होते. मात्र ते अर्ज नाकारण्यात आले. त्यानंतर लॉरेंस यांनी झाडाची साल काढली आणि त्यात दोन होल केले, जेणेकरून झाड सुकून जाईल व त्यामुळे झाड तेथून काढता येईल.

Image Credited -The Sun Best

तक्रार आल्यावर काउंसिलने मान्य केले की, लॉरेंस यांनी झाडाला नुकसान पोहचवले आहे. यामुळे झाड पडू शकते. अधिकाऱ्यांनी यासाठी स्थानिक न्यायालयात धाव घेतली. येथे लॉरेंसने जाणूनबुजून झाडाला नुकसान पोहचवल्याचे मान्य केले. त्यानंतर न्यायालयाने लॉरेंसला 83 लाख रुपये (90 हजार पाउंड) दंड ठोठवला. यात 92 हजार रुपये (1004 पाउंड) झाडाची किंमत आणि 2949 रुपये (32 पाउंड) सरचार्ज लावला. मात्र नंतर लॉरेंसद्वारे याचना केल्यावर न्यायालयाने दंडाची रक्कम कमी करत 55 लाख रुपये केली.

सस्टेनिबल कम्युनिटीज कॅबिनेटचे सदस्य आणि काउंसिलर माइक मॅक्रोरी यांच्यानुसार, दंडाची रक्कम झाडाचे वय आणि त्याची किंमत यावरून ठरवण्यात आली. झाड खूप जुने आहे. लहान मुले रोज त्याच्या खाली खेळतात. पर्यावरणासाठी खूप उपयुक्त आहे. लॉरेंसच्या यांच्या संपत्तीपेक्षा झाडाची उपयोगिता अधिक आहे. 1908 मध्ये घर बनवल्यानंतर 20 वर्षांनी झाड लावण्यात आले होते.

Leave a Comment