मुंबई पोलिसांच्या ‘शेरलॉक होम्स’ने 26 वर्षात शोधल्यात 700 हरवलेल्या व्यक्ती

(Source)

हॉलिवूड चित्रपट फ्रेचाइंजी ‘शेरलॉक होम्स’ अनेक लोकांनी पाहिला असेल. चित्रपटातील शेरलॉक या पात्राच्या हेरगिरीचे तर सर्वच चाहते आहेत. मात्र ते एक चित्रपटातील पात्र होते. आज आम्ही तुम्हाला खऱ्या आयुष्यातील शेरलॉक होम्सबद्दल सांगणार आहोत. मुंबईच्या एक पोलीस कर्मचाऱ्याने शेरलॉक स्टाईलमध्ये हरवलेल्या 700 व्यक्तींच्या केसेस सोडवल्या आहेत.

या पोलीस अधिकाऱ्याचे नाव राजेश पांडे आहे. ते मुंबई पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या 26 वर्षांच्या करिअरमध्ये 700 मिसिंग केसेज सोडवल्या आहेत. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन एक चित्रपट निर्माते चित्रपट देखील बनवणार आहे. यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांकडे चित्रपट बनवण्यासाठी अर्ज देखील केला आहे.

राजेश पांडे यांच्या कामाच्या पद्धतीमुळे मुंबईचे माजी पोलिस कमिश्नर दत्ता पडसलगीकर देखील प्रभावित झाले. त्यांनी पांडे यांच्या कामाला ‘पांडे मॉड्यूल’ असे नाव दिले आहे. दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना देखील तक्रारींचे निवारण करण्यासाठी पांडे मॉड्यूलप्रमाणे कार्य करण्याचा सल्ला दिला आहे.

52 वर्षीय पांडे याबाबत सांगतात की, हरवलेल्या लोकांच्या बाबतीत, खास करून लहान मुलांसंबंधी प्रकरणे सोडवणे एका गुन्ह्याचा तपास करण्यापेक्षा अधिक आहे.

पांडे हरवलेल्या लोकांचा तपास करण्यासाठी क्रिएटिव्हिटीचा वापर करतात. त्यांचे नेटवर्क देखील मोठे आहे. ज्यामध्ये शिलाई कामगार, गेस्ट हाऊसमध्ये काम करणारे, बार कर्मचारी इत्यादींचा समावेश आहे. हरवलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी ते देशभर प्रवास करतात.

एका मोलकरणीच्या शोधासाठी ते पश्चिम बंगालला पोहचले होते. त्यांना समजले की, जबरदस्ती लग्न लावून किडनॅप करून तिला घरात बंद करून ठेवले होते. त्या व्यक्तीला पकडण्यासाठी कुरिअर बॉयचा वेश धारण केला होता. आपल्या टीमच्या मदतीने त्यांनी त्या महिलेला वाचवले.

आपल्या 26 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी 3 पोलीस स्टेशनमध्ये काम केले. 2005 पासून त्यांनी सर्व प्रकरण सोडवली आहेत. केवळ एका 14 वर्षांच्या मुलीला ते शोधू शकले नाहीत. ती मुलगी तिसऱ्यांदा गायब झाली आहे. दोन वेळा पांडे यांनी त्या मुलीला शोधले होते. यावेळी देखील त्या मुलीला शोधून केस सोडवतील अशी त्यांना आशा आहे.

Leave a Comment