एका वर्षात सव्वा लाख कोटींनी वाढली मुकेश अंबानींची संपत्ती !


मुंबई : जगभरातील उद्योजकांना मंदी आणि भांडवली बाजारातील अनिश्चिततेने हैराण केले असतानाच याला ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे मुकेश अंबानी अपवाद ठरले आहेत. अंबानी यांच्या संपत्तीत मागील वर्षभरात थोडी थोडकी नव्हे तर तब्बल १ लाख १९ हजार कोटींची वाढ झाली आहे. अंबानी यांच्या संपत्ती वाढीत रिलायन्सच्या शेअरने सिंहाचा वाट उचलला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर मागील वर्षभरात तब्बल ४० टक्क्यांनी वधारला. त्यामुळे आता चार लाख कोटींच्या पुढे अंबानी यांची एकूण संपत्ती गेली आहे. आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून अब्जाधीश मुकेश अंबानी ओळखले जातात. त्यांची संपत्ती ६१ अब्ज डॉलर अर्थात ४ लाख २७ हजार कोटी आहे.

अंबानी यांच्या संपत्तीत वाढ झाली असतानाच अॅमेझॉनचे बॉस जेफ बेझॉस यांच्या संपत्तीत १३.२ अब्ज डॉलरची घट झाली. मागील वर्षभरात बेझॉस यांच्या संपत्तीत ९२ हजार ४०० कोटी रुपयांची घट झाली आहे. जागतिक पातळीवर अतिश्रीमंत उद्योजकांपैकी एक असलेल्या ‘अलिबाबा’चे संस्थापक जॅक मा यांच्या संपत्तीत ११.३ अब्ज डॉलरची (७९ हजार १०० कोटी) वाढ झाली आहे.

Leave a Comment