राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला (NPR) मोदी सरकारची मंजुरी


नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) अद्ययावत करण्यासाठी मंगळवारी मंजुरी दिली. या कामासाठी ८५०० कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी देण्यात आल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. या कामासाठी ८५०० कोटी रुपये देण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या कामाची सुरुवात पुढील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये एप्रिल महिन्यात होईल. देशात राहणाऱ्या नागरिकांची माहिती यात गोळा केली जाते. या आधी २०१५ मध्ये घरोघरी जाऊन नागरिकांकडून त्यांची माहिती गोळा करण्यात आली होती. ही सर्व माहिती डिजिटल स्वरुपात साठविण्याचे काम पूर्ण झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक पार पडली. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी माहिती अद्ययावत करण्याचे काम या बैठकीत प्राधान्य क्रमांकावर होते.

Leave a Comment