… अन्यथा मर्सिडिज बेंझच्या ग्राहकांना मोफत मिळणार कार सर्विस

(Source)

देशातील सर्वात मोठी लग्झरी कार कंपनी मर्सिडिज बेंझने आपल्या ग्राहकांसाठी खास प्रिमियम एक्सप्रेस प्राइम कार सर्विस सेवा सुरू केली आहे. ग्राहकांचा विश्वास वाढावा यासाठी कंपनीने ही सेवा सुरू केली आहे.

कंपनीने आपल्या कार्यक्षमतेकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. ग्राहक आता मर्सिडिज कार्सची केवळ 3 तासात सर्विस करू शकतात व सर्विससाठी या पेक्षा अधिक वेळ लागल्यास ग्राहकांकडून कोणतेही पैसे घेतले जाणार नाहीत. प्रिमिअर एक्सप्रेस प्राइम ही सेवा सध्या बंगळुरू येथे सुरू करण्यात आली असून, लवकरच दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि कोलकात्यात देखील ही सेवा सुरू केली जाणार आहे.

मर्सिडिजचे म्हणणे आहे की, ग्राहकांचा विश्वास वाढावा व त्यांना चांगला अनूभव यावा यासाठी त्यांच्या 25 योजनांपैकी ही एक आहे. मर्सिडिज भारतात आपले 25 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी अनेक खास योजना आणत आहे.

काही दिवसांपुर्वीच मर्सिडिजने फायनान्स पर्यायामध्ये बदल, आकर्षक बाय-बॅक योजना आणि विक्रीनंतर आउटरीच सोबत सहाय्यता या सारख्या गोष्टींमुळे ग्राहकांमधील विश्वासार्ह्यता वाढवली आहे.

Leave a Comment