पृथ्वीच्या जवळून जाणार आयफेल टॉवरपेक्षा दुप्पट मोठा लघुग्रह

Image Credited-thedigitalwise

जगभरात ख्रिसमसचा सण साजरा केला जात असतानाच, पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षाही दुप्पट मोठा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून ताशी 44,172 किमी वेगाने जाणार आहे. हा लघुग्रह याच आठवड्यात 26 डिसेंबर म्हणजेच बॉक्सिंग डेच्या दिवशी सकाळी 7.52 वाजता पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल.

नासानुसार, या लघुग्रहाचा व्यास जवळपास 2,034 फूट आहे. असे लघुग्रह अनेकवेळा पृथ्वीच्या जवळून जातात व नासा याबाबत अलर्ट करत असते. अनेकदा एकाच दिवशी अनेक लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जातात व पृथ्वीवरील लोकांना याची माहिती देखील नसते. या लघुग्रहाला 2000 सीएच-69 असे नाव देण्यात आलेले आहे.

नासाचा अंदाज आहे की, याचा आकार 919 ते 2,034 फूट असण्याची शक्यता आहे. आयफेल टॉवर (1,063 फूट) आणि एंपायर इस्टेट बिल्डिंग (1,453 फूट) पेक्षाही हा लघुग्रह मोठा आहे. हा लघुग्रह पृथ्वीच्या 7,291,400 किमी अंतरावरून जाईल. म्हणजेच पृथ्वीची चंद्राच्या अंतरापेक्षा 19 पटीने अधिक अंतरावरून जाईल. खगोलीय भाषेत ते पृथ्वीच्या खूपज जवळून जात आहे. हे अंतर पृथ्वी आणि सुर्यामधील अंतराच्या 12 व्या भागा एवढे आहे.

 

Leave a Comment