लष्कराच्या अधिकाऱ्याने बनवले स्वदेशी बुलेट प्रुफ जॅकेट

Image Credited – amarujala

जम्मू-काश्मिरमध्ये सीमेवर अनेकदा भारतीय सैन्य आणि पाकिस्तानी सैन्य एकमेंकासमोर उभे टाकतात. भारतीय सैनिक पाक सैन्याच्या गोळ्यांचा सामना करत देशाचे रक्षण करतात. याचसाठी स्वतः गोळी खाणारे मेजरने स्वदेशी बनावटीचे बुलेट प्रुफ जॅकेट निर्माण केले आहे. हे जॅकेट स्नाइपर रायफलच्या गोळ्याही झेलू शकते.

Image Credited -Amarujala

हे जॅकेट निर्माण करणारे मेजर अनूप मिश्रा यांनी सांगितले की, आम्ही लेव्हल 4 बुलेट प्रुफ जॅकेट विकसित केले आहे. याला पुण्याच्या मिलिट्री इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तयार करण्यात आलेले आहे. हे जॅकेट स्नायपर रायफल्सच्या मारलेल्या गोळ्याही झेलू शकते.  अशी क्षमता असणारा भारता जगातील तिसरा देश आहे.

Image Credited -Amarujala

आर्मी टेक्नोलॉजी सेमिनारमध्ये सेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांनी मेजर मिश्रा यांचा आर्मी डिझाईन ब्यूरो एक्सीलेंस अवॉर्डने सन्मानित केले.

मेजर मिश्रा यांनी सांगितले की, नियंत्रण रेषा आणि काश्मिर खोऱ्यात स्नायपर हल्ल्यांना बघून जवानांसाठी पुर्ण शरीरासाठी सुरक्षा कवच असणे गरजेचे असल्याचे जाणवले. जॅकेटचे इन्फॅन्ट्रीकडून टेस्टिंग करण्यात आले आहे. भारतीय लष्कराकडून फुल बॉडी प्रोटेक्शन बुलेट प्रुफ जॅकेट्ससाठी टेंडर जारी करणे गरजेचे आहे. याचे उत्पादन भारतीय संरक्षण उद्योगासंबंधिताकडून केले जाईल.

Image Credited -Amarujala

मेजर अनुप मिश्रा यांनी सांगितले की, जम्मू-काश्मिरमध्ये असताना एका ऑपरेशन दरम्यान त्यांना गोळी लागली. त्यावेळी त्यांनी बुलेट प्रुफ जॅकेट घातले असल्याने गोळी शरीराला भेदू शकली नाही. मात्र गोळीचा परिणाम शरीरावर झाला. त्यामुळे त्यांनी बुलेट प्रुफ जॅकेट बनवण्याचा निर्णय घेतला. हे जॅकेट 10 मीटरवरून देखील स्नायपर बुलेटचा सामना करू शकते.

Leave a Comment