लाखो प्लास्टिक बाटल्यांपासून बनविण्यात आला आहे हा ख्रिसमस ट्री

(Source)

सध्या जगभरात प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात येत आहे व प्लास्टिक न वापरण्याविषयी जागृक केले जात आहे. अशाच प्रकारे लोकांना प्लास्टिकचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी उत्तर लेबनानमध्ये एक खास प्रकारची निर्मिती करण्यात आली. तेथे 1 लाख 20 हजार प्लास्टिकच्या बाटल्यांपासून 28.5 मीटर उंच ख्रिसमस ट्री तयार करण्यात आला आहे. या ट्रीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

उत्तरी लेबनानच्या चेक्का गावात हा ख्रिसमस ट्री असून, याला बनवण्यासाठी गावकऱ्यांना 20 दिवस लागले. गावकऱ्यांचा दावा आहे की, प्लास्टिक बाटल्यांपासून बनलेला हा सर्वात मोठा ख्रिसमस ट्री आहे.

(Source)

या ट्रीच्या प्रोजेक्ट हेड कॅरोलिनी छेबिटीनी यांचे म्हणणे आहे की, हे झाड जगभरातील लोकांना प्लास्टिकपासून पर्यावरण सुरक्षित ठेवण्याचा संदेश देईल.

(Source)

ख्रिसमस ट्री बनवण्याची तयारी मागील 6 महिन्यांपासून सुरू आहे. गावकऱ्यांनी सोशल मीडियाच्या मदतीने 6 महिन्यात 1,29,000 लाख बाटल्या जमवल्या. प्रोजेक्ट हेड कॅरोलिनी यांच्यानुसार, सोशल मीडियाद्वारे बाटल्यांसाठी करण्यात आलेल्या आवाहानाला अनेकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला. ख्रिसमस ट्री दीड महिने तसाच ठेवला जाईल. त्यानंतर या बाटल्यांना रिसायकल्ड करण्यात येईल. सोबतच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज करणार आहे.

(Source)

याआधी 2018 मध्ये मॅक्सिकोत 94 हजार बाटल्यांनी ख्रिसमस ट्री तयार करण्यात आला होता. 22 टनांच्या या झाडाला मॅक्सिकोची संस्था गोर्बियर्नो डेल इस्टडो डे एगुआस्केलिनेट्सने तयार केली होती.

टीमशी जोडलेले अलेक्झेंडर यांनी सांगितले की, ट्री बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या बाटल्या रिसायकल्ड केल्यानंतर होणारी कमाई रेड क्रॉसला डोनेटे केली जाईल.

Leave a Comment