पुढील वर्षी व्हॉट्सअॅपमध्ये दाखल होणार हे फीचर्स


आपल्या युझर्सना फेसबुकच्या मालकीचे असलेले लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप सातत्याने नवनवे फीचर्स देत असते. व्हॉट्सअॅपने यावर्षी फिंगरप्रिंट लॉक, ब्लॉक कॉन्टॅक्ट्स, मीडिया हाइड आणि स्टेटस प्रायव्हसी यासारखी अनेक फीचर्स दिल्यानंतर आता अजूनही बर्‍याच नव्या फिचर्सवर व्हॉट्सअ‍ॅप काम करत आहे. हे फीचर्स युजर्सना पुढील वर्षी वापरायला मिळू शकतात. डार्क मोड, फेस अनलॉक, डिसअ‍ॅपिअरिंग मेसेज, लास्ट सीन फॉर सिलेक्टेड फ्रेंड्स आणि फेसबुक पे यांसारख्या फीचर्सचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे.

मागील बर्‍याच दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप युजर्स डार्क मोडची वाट पाहत आहेत. हे फीचर गेल्या अनेक महिन्यांपासून डेव्हलपमेंट मोडमध्ये असून डार्क मोड बीटा व्हर्जनमध्ये तीन पर्यायांसह मिळेल. डार्क मोडमध्ये बॅकग्राउंड ब्लॅक रंगाचे होईल तर टेक्स्ट व्हाइट रंगात दिसतील.

फिंगरप्रिंटच्या मदतीने चॅटिंग सुरक्षित करण्याचा पर्याय दिल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप पुढच्या वर्षी फेस अनलॉक फीचर आणण्याची दाट शक्यता आहे. पण, हे फीचर नेमके कधी सुरू होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. एक विशेष अपडेट आणायच्या तयारीत कंपनी असून युजरने याद्वारे सेंड किंवा रिसिव्ह केलेले मेसेज युजरने निश्चित केलेल्या मर्यादेनंतर ‘गायब’ होतील. सुरूवातीला हे फीचर केवळ ग्रुप अॅडमिन वापरु शकतील अशी चर्चा आहे.

व्हॉट्सअ‍ॅप युजर्स आता आपल्या कॉन्टॅक्ट्सने मेसेज केव्हा चेक केला हे पाहू शकतात. हे लपवण्याचा एक पर्यायही उपलब्ध आहे पण असे केल्याने वापरकर्ते उर्वरित लोकांचे लास्ट सीन पाहू शकत नाहीत. व्हॉट्सअ‍ॅप पुढील वर्षी आपल्या युजर्सना काही फ्रेंड्ससाठी लास्ट सीन पर्याय सुरू करण्याचा पर्याय देऊ शकतो. हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपने आधीच सादर केले होते पण हे फीचर अद्याप सर्वांसाठी सुरू करण्यात आलेले नाही. पण हे फीचर पुढील वर्षी सर्व युजर्ससाठी उपलब्ध केले जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment