चीफ ऑफ डिफेंस स्टाफ पदाच्या नियुक्तीला केंद्रीय सुरक्षा समितीची मंजूरी

Image Credited – The Tribune

सुरक्षा प्रकरणांच्या मंत्रीमंडळ समितीने चीफ ऑफ डिफेंस स्टाफच्या पदाची नियुक्ती करण्यास मंजूरी दिली आहे. सुरक्षा समितीने चीफ ऑफ डिफेंस स्टाफचे दायित्व निश्चित करणारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या नेतृत्वाखालील समितीचा अहवाल मंजूर केला आहे.

कॅबिनेटच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची माहिती देताना सांगितले की, सरकारने चीफ ऑफ डिफेंस स्टाफची नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. या पदावर नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्याला चार स्टार जनरलचा दर्जा मिळेल.

तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, उच्च संरक्षण व्यवस्थेच्या दिशेने हा ऐतिहासिक निर्णय आहे.

का आहे चीफ ऑफ डिफेंस स्टाफची गरज ?

कारगिल युद्धादरम्यान हवाई दल आणि भारतीय सैन्यामध्ये ताळमेळाचा अभाव दिसून आला होता. हवाई दलाच्या वापरावर तत्कालीन वायूदल अध्यक्ष आणि सेनाध्यक्षांचे विचार वेगळे होते. त्यामुळे चीफ ऑफ डिफेंस स्टाफची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारी नेतृत्वासाठी सैन्य सल्लागारची भूमिका महत्त्वाची आहे.

अनेकांनी या पदाला विरोध देखील केला आहे. एका व्यक्तीकडे जास्त सैन्य शक्तीचे केंद्रीकरणाची समस्या होऊ शकते. वर्ष 2012 मध्ये नरेश चंद्र समितीने चीफ ऑफ स्टाफ समितीच्या स्थायी अध्यक्षाची शिफारस केली होती.

सध्या काय व्यवस्था आहे ?

भारत सरकारने तिन्ही सैन्यातील सर्वात वरिष्ठ जनरलला चीफ ऑफ आर्मी स्टाफची मंजूरी दिली आहे. तिन्ही सैन्याची संयुक्त कमांडर कॉन्फ्रेंस होते आणि सुरक्षा प्रकरणात कॅबिनेटमध्ये तिन्ही सैन्यांचे प्रमूख असतात.

कारगिल युद्धानंतर स्थापन समितीने केलेल्या शिफारसीनंतर देखील गेली 19 वर्ष या पदाबाबत काहीही निर्णय घेण्यात आला नव्हता.

काय असतो चीफ ऑफ डिफेंस स्टाफ ?

चीफ ऑफ डिफेंस स्टाफ सरकारसाठी सैन्य संरक्षण क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करेल. या पदाचे प्रमुख कार्य तिन्ही सैन्यात दीर्घकालीन योजना, खरेदी, प्रशिक्षण आणि अन्य संसाधनांमध्ये समन्वय स्थापित करणे हे असेल. चीफ ऑफ डिफेंस स्टाफचे पद हे तिन्ही सेनाध्यक्षांपेक्षा मोठे असेल. तिन्ही सैन्य आणि त्यांच्या प्रमुखांमध्ये समन्वय स्थापित करण्याचे महत्त्वाचे काम असेल. याशिवाय संरक्षण क्षेत्रातील बजेट, संसाधने, योजनामध्ये देखील महत्त्वाची भूमिका असेल.

युद्धाच्या पद्धती बदलत आहेत. सायबर आणि अंतराळ युद्ध सारखे नवीन युद्ध क्षेत्र निर्माण झाले आहेत. अमेरिका आणि चीनने आधीच अंतराळ सैन्य कमांड तयार केले आहे. भारताने देखील सैन्य कमांडची घोषणा केली होती.

पंतप्रधान करणार चीफ ऑफ डिफेंस स्टाफची निवड –

अंतर-सेवेमधील वरिष्ठतेचा मुद्दा लक्षात घेतल्यास वर्तमान सैन्य प्रमुखांपैकीच एक चीफ ऑफ डिफेंस स्टाफ असून शकते. जनरल रावत पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ असण्याची शक्यता आहे.

वयोमर्यादा वाढवण्याची शक्यता –

जनरल रावत सेनाध्यक्ष म्हणून आपला 3 वर्षांचा कार्यकाळ येत्या 30 डिसेंबरला सेवानिवृत्त होतील. ते पुढील वर्षी 16 मार्चला 62 वर्षांचे होतील. त्यामुळे सरकार वयोमर्यादा वाढवण्याची शक्यता आहे. वयोमर्यादा 62 वरून 64 वर्ष केल्यास बिपिन रावत या पदासाठी पात्र ठरतील.

Leave a Comment