गुगलच्या सह-संस्थापकाविरोधात पत्नीने दाखल केली तक्रार

Image Credited – CNBC.com

गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज आणि सर्गी ब्रेन यांच्याविषयी प्रत्येकाला माहिती आहे. मात्र गुगलचे तिसरे सह-संस्थापक देखील आहेत. त्यांचे नाव स्कॉट हसन आहे. सध्या स्कॉट हसन एका वाईट कारणामुळे चर्चेत आहेत.

हसन यांच्या पत्नीचा त्यांच्यावर आरोप आहे की, दोघांच्या मध्ये सुरू असलेल्या घटस्फोटाच्या कारवाई दरम्यानच हसनने आपल्या रोबोटिक स्टार्टअपला जाणून बुजून एका ‘फायर सेल’मध्ये ( जेथे मोठ्या प्रमाणात वस्तूंवर सूट मिळते व विक्री होते) विकले.

डेलावेअर येथे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये एलियन हुआनने म्हटले आहे की, त्यांच्या पतीने तंत्रज्ञान कंपनीला 4 लाख डॉलर या अयोग्य किंमतीत डेनमार्क येथील कंपनी ब्लू ओशनला विकले.

तक्रारीमध्ये म्हटले आहे की, कंपनीचा मूळ पोर्टफोलियो, एकूण संपत्ती आणि त्याची लायसेंसिंग क्षमतेला लक्षात घेऊन याला अधिक किंमतीत विकण्याची गरज होती. स्कॉट हसन आणि एलियन हुआन यांच्यामध्ये यावरून वाद सुरू आहे.

वर्ष 2001 मध्ये दोघांचे लग्न झाले होते व 2015 पासून घटस्फोटाची कारवाई सुरू आहे.

रिपोर्टनुसार, एलिसनने देखील कंपनीमध्ये पैसे लावले होते. त्यामुळे कंपनीचे भागीदार म्हणून हसनविरोधात तक्रार दाखल करण्यास एलिसन योग्य आहेत.

Leave a Comment