चक्क सांताक्लॉज बनून पोलीस करत आहेत वाहनचालकांना शिक्षित

Image Credited – Dynamite News

सध्या सर्वत्र ख्रिसमस सणानिमित्ताने रोषणाई आणि आनंदाचे वातावरण दिसत आहे. याच निमित्ताने गोव्याच्या वाहतूक पोलिसांनी पणजीमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना शिक्षित करण्यासाठी एक अनोखी कल्पना शोधली आहे.

सांताक्लॉजसारखा ड्रेस परिधान करून वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल चॉकलेट वाटून दुचाकीचालकांना वाहतुकीच्या नियमांबद्दलम माहिती देत आहेत.

पणजी वाहतूक पोलिस इंस्पेक्टर ब्रँडन डीसूजा यांनी सांगितले की,  आम्ही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना पकडले व त्यांनी सुरक्षेबाबत माहिती दिली. आम्ही या सणाच्या निमित्ताने संदेश देण्यासाठी या हटक्या पद्धतीचा वापर केला.

ते म्हणाले की, अनेक दुचाकीचालकांनी आयएसआय मार्क नसलेले हेल्मेट घातले होते तर कारचालकांनी सीट बेल्ट लावला नव्हता.

एक वाहनचालक सँड्रा अल्वारेस म्हणाल्या की, या हटक्या पद्धतीने वाहनचालकांना शिक्षित करण्यासाठी वाहतूक पोलिसांचे धन्यवाद. संदेश प्रसारित करण्याचा हा योग्य मार्ग आहे.  लोक सण साजरा करण्यात गुंतले असताना, वाहतूक पोलीस त्यांचे प्राण वाचवण्यात व्यस्त आहेत.

Leave a Comment