ऑस्ट्रेलियात आग विझवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शीख समुदायाचा मदतीचा हात

Image Credited – bhaskar.com

ऑस्ट्रेलियातील जंगलातील आगीमुळे सलग दुसऱ्यांदा आणीबाणी लागू करण्यात आली आहे. जंगलात लागलेली आग शहराच्या दिशेने पसरत आहे. ही आग विझवण्यासाठी 2000 पेक्षा अधिक अग्निशामक दलाचे कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहे. या परिस्थितीमध्ये मेलबर्न येथील शीख समुदायाने देखील मदतीचा हात पुढे केला आहे.

या लोकांनी रविवारी रात्री 700 किमीपर्यंत गाडी चालवत आग विझवणाऱ्या  अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना 350 कर्मचाऱ्यांना जेवणाचे पॉकिट पोहचवले.

मेलबर्न येथील बुशफायर भागात आग पसरली आहे. लोकांना सिडनीला पाठवले जात आहे. शीख समुदायाचे सेक्रेटरी गुरजीत सिंह यांनी सांगितले की, आम्ही जेव्हा ऑस्ट्रेलियाला आलो होतो, त्यावेळी आमच्याकडे दोन बॅग्स होत्या. आज आमच्याकडे खूप काही आहे. या देशाने आम्हाला खूप काही दिले आहे. आम्ही लोकांना मदत करण्यास सक्षम आहोत. या गंभीर  स्थितीत आम्ही नेहमीच ऑस्ट्रेलियाबरोबर उभे आहोत आणि पुढेही राहू. आम्ही आग विझवण्याची ट्रेनिंग देखील घेत आहोत, जेणेकरून अशा स्थितीमध्ये मदत करता येईल.

Leave a Comment