ख्रिसमस ट्रीला प्रकाशमय करत आहे 800 वॉल्ट वीज निर्माण करणारा हा मासा

(Source)

जगभरात अनेक प्रकारचे जीव-जंतू आहेत. जे आपल्या विविध वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहेत. एका अशाच माशाचे वैशिष्ट्य समजल्यावर तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. हा मासा वीज निर्माण करतो. या माशाला अमेरिकेच्या टॅनेस्सी राज्यातील चट्टानुगा इक्वेरियममध्ये ठेवण्यात आले आहे. खास गोष्ट म्हणजे या माशातून उत्पन्न होणाऱ्या वीजद्वारे इक्वेरियममध्ये ठेवलेल्या ख्रिसमस ट्रीला देखील प्रकाश देण्यात येत आहे.

(Source)

या मासा इलेक्ट्रिक ईल असून, त्याला मिगुएल वॉटसन असे नाव देण्यात आलेले आहे. हा मासा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लवकरच ख्रिसमसचा सण येणार असल्याने इक्वेरियमच्या आत एक ख्रिसमसचे छोटे झाड लावण्यात आले असून, त्याला लाईट्स व गिफ्ट्सने सजवण्यात आलेले आहे. या झाडाला ईलेक्टिरक ईल स्वतःच्या वीजेने प्रकाशमय करतो.

इक्वेरियमच्या आत एक खास प्रकारचे सेंसर लावण्यात आलेले आहे. जेव्हा मास वीज उत्पन्न करतो तेव्हा सेंसर ख्रिसमस ट्रीवर लावलेल्या लाईट्स व साउंड सिस्टमपर्यंत पोहचवते.

(Source)

हा मासा वीज तेव्हाच उत्पन्न करतो, जेव्हा तो अन्नाच्या शोधात असतो अथवा उत्तेजित होतो. सर्वसाधारणपणे एक इलेक्ट्रिक ईल 10 वॉल्ट वीज निर्माण करते. मात्र मासा पुर्ण क्षमतेचा वापर करून 800 वॉल्टपर्यंत वीज उत्पन्न करू शकतो.

(Source)

जगात सर्वाधिक इलेक्ट्रिक ईल मासा दक्षिण अमेरिकेतील नदीत आढळतो. एखाद्या सापाप्रमाणे दिसणाऱ्या या माशाला श्वास घेण्यासाठी पाण्याच्या बाहेर यावे लागते. हा मासा पुर्ण वेळ समुद्रात नसतो.

Leave a Comment