शैक्षणिक कर्जाची गरज आहे ? जाणून घ्या या गोष्टी

(Source)

आता शिक्षण घेणे हे देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याचा बाहेर गेले असून, कोणत्याही शाळा, कॉलेजमध्ये अॅडमिशनसाठी लाखो रूपये भरावे लागतात. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे कोठून आणायचे याची चिंता पालकांना असते. अशा परिस्थितीमध्ये शैक्षणिक कर्ज महत्त्वाचे ठरते. शैक्षणिक कर्ज कसे मिळते याविषयी जाणून घेऊया.

कसे मिळते शैक्षणिक कर्ज –

हे कर्ज पोस्ट ग्रॅज्युएशन अथवा कोणत्याही प्रोफेशनल शिक्षणसाठी घेता येते. ज्या बँकेत तुमचे खाते आहे तेथून तुम्ही कर्ज घेऊ शकता. ज्या शैक्षणिक संस्थेसाठी तुम्ही कर्ज घेत आहात, ती जर सरकारी मान्यता प्राप्त असेल तर कर्ज घेण्यासाठी जास्त अडचण येत नाही. शैक्षणिक कर्जामध्ये कॉलेज फी, हॉस्टेल खर्च, लायब्रेरी आणि अभ्यासाठी कॉम्प्युटरचा खर्च देखील येतो.

कागदपत्रे –

विद्यार्थीची मागील वर्षाची मार्कशीट, एंट्रेंस आणि स्कॉलरशीपची कागदपत्रे, कोर्स दरम्यान होणाऱ्या खर्चाचे प्रमाणपत्र, मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट्स आणि आई-वडील दोघांचे मागील 2 वर्षांचे आयटीआर प्रमाण द्यावे लागते.

अटी –

शैक्षणिक कर्जासाठी भारतीय असणे गरजेचे आहे. 16 ते 35 वयोगटातील विद्यार्थी या कर्जासाठी अर्ज करू शकतात. विद्यार्थी अर्ज करत असेल तर त्या मिळणारी कर्जाची रक्कम ही पालकांच्या मासिक उत्पन्नावर आधारित असते.

आयकर कायदा कलम 80ई अंतर्गत याचे व्याज भरण्यावर करात सूट मिळवण्यासाठी देखील क्लेम करता येतो.

Leave a Comment