चक्क डोळे बंद करून मिनिटात रूबिक क्यूब सोडवतो हा मुलगा

(Source)

रूबिक क्यूब सोडवणे प्रत्येकाचे काम नाही. मात्र अरूणाचलमधील एक मुलगा डोळे बंद करून 1 मिनिटांच्या आत रूबिक क्यूब सोडवतो. या मुलाचे नाव चिंगता असे असून, या मुलात जबरदस्त टॅलेंट आहे.

ट्विटरवर इंडियन फॉरेस्ट सर्विसचे अधिकारी प्रविण कासवान यांनी या मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. चिंगता अरूणाचलच्या लोंगडिंग जिल्ह्यातील लोंगकाई या गावात राहतो. या एका मिनिटाच्या व्हिडीओमध्ये चिंगता सहज डोळे बंद करून रूबिक क्यूब सोडवताना दिसत आहे.

व्हिडीओ शेअर करताना कासवान यांनी लिहिले की, आमच्या दुर्गम गावातील या प्रतिभेला बघा. मला हा व्हिडीओ कोणीतरी फॉरवर्ड केला. त्यामध्ये म्हटले आहे की, हा अरूणाचलचा आहे. हा मुलगा लोंगडिंग जिल्ह्यातील वांचो जनजातीशी संबंधित आहे. गाव लोंगकाई आहे.

ट्विटरवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे व युजर्स चिंगताच्या या प्रतिभेचे कौतूक करत आहेत.

Leave a Comment