अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोरमधून हटवले हे चॅटिंग अ‍ॅप

Image Credited – TechRepublic

टेक कंपनी अ‍ॅपलने आपल्या अ‍ॅप स्टोरमधून चॅटिंग अ‍ॅप ToTok काढून टाकले आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टनंतर हे अ‍ॅप स्टोरमधून हटवण्यात आले. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हे अ‍ॅप स्पाइंग टूलचा वापर करत होते.

हे एक व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणे चॅटिंग अ‍ॅप आहे. यामध्ये इंस्टट मेसेजिंग आणि व्हिडीओ कॉलिंगसारखे फीचर्स आहेत.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या अ‍ॅपचा वापर यूएई सरकार युजर्सची हेरगिरी करण्यासाठी करत आहे. हे अ‍ॅप मिडिल ईस्ट, यूरोप, आशिया, आफ्रिका आणि नॉर्थ अमेरिकेत लाखो यूजर्स वापरतात. रिपोर्टनुसार, अ‍ॅप युजर्सचे चॅट, हालचाल, रिलेशनशिप, अपाईंटमेंट, साउंड आणि फोटो ट्रॅक करत होते.

अ‍ॅप रिसर्च कंपनी अ‍ॅप एनीनुसार, हे अ‍ॅप अमेरिकेत सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या अ‍ॅप पैकी एक आहे. रिपोर्टनुसार, हे अ‍ॅप ब्रिज होल्डिंगद्वारे डेव्हलप करण्यात आले आहे. ब्रिज होल्डिंग आबूधाबी येथील कॉम्प्युटर इंटेलिजेंस आण हॅकिंग कंपनी डार्कमॅटेरशी संबंधित आहे.

गुगलकडून देखील प्ले स्टोरमधून अँड्राईड युजर्ससाठी काढून टाकण्यात आले आहे.

Leave a Comment