पाकमधून नव्हे तर या देशातून भारतात येतात सर्वाधिक शरणार्थी

Image Credited – Scroll.in

नागरिकत्व कायदा 2019 मुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 देशातील अल्पसंख्याकांना भारताचे नागरिक्तव मिळणे सोपे झाले आहे. या देशातून भारतात अनेक शरणार्थी येतात. मात्र या तिन्ही पैकी एकही देश सर्वाधिक शरणार्थी येणाऱ्या यादीत टॉपवर नाहीत.

कोणाला म्हणतात शरणार्थी ?

संयुक्त राष्ट्राचे शरणार्थी उच्चायुक्तानुसार, शरणार्थी ते लोक असतात जे युद्ध, हिंसा अथवा कोणत्याही कारणामुळे छळामुळे आपला देश सोडून दुसऱ्या देशात जाऊन राहतात. मात्र शरणार्थींचा दर्जा मिळवण्यासाठी देखील प्रक्रिया आहे.

शरणार्थी दर्जा मिळवण्यासाठी त्या देशातील सरकारकडे अर्ज करावा लागतो. जो पर्यंत अर्ज स्विकार केला जात नाही, तोपर्यंत शरणार्थी दर्जा मिळत नाही.

जगात सर्वाधिक शरणार्थी हे सिरीया (63,24,551)  या देशाचे आहेत. त्यानंतर अफगाणिस्तान, दक्षिण सुदान, म्यानमार, सोमालिया, भारत (9,601) या देशातील शरणार्थी दुसऱ्या देशात आहेत.

भारतीय शरणार्थी –

अमेरिकेत सर्वाधिक प्रमाणात भारतीय शरणार्थी आहेत. यांची संख्या 6,110 एवढी आहे. तर त्यानंतर कॅनडामध्ये 1,457 भारतीय शरणार्थी आहेत.

शरणार्थी आणि भारत-पाकिस्तान –

दुसऱ्या लोकांना शरण देणाऱ्या यादीत तुर्की पहिल्या स्थानावर आहे. येथे दुसऱ्या देशातील 36,81,685 शरणार्थी आहेत. त्यानंतर पाकिस्तानमध्ये 14,04,019 शरणार्थी आहेत. तर भारतात 1,95,891 शरणार्थी दुसऱ्या देशातून आलेले आहेत.

कोणत्या देशातून येतात भारतात शरणार्थी ?

भारतात सर्वाधिक प्रमाणात येणाऱ्या शरणार्थींमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश नसून चीन हा देश आहे. चीनमधून सर्वाधिक 1,08,008 शरणार्थी भारतात आले आहेत. त्यानंतर श्रीलंका 60,802 आणि म्यानमारमधून 18,813 शरणार्थी भारतात आले आहेत.

2018 मध्ये भारतात शरणार्थी दर्जा मिळवण्यासाठी 8,411 जणांनी अर्ज केला. त्यातील केवळ 1,728 जणांना सकारात्मक उत्तर मिळाले. तर 2018 अखेरपर्यंत एकूण 11,957 प्रलंबित प्रकरणे आहेत.

2018 मध्ये किती भारतीयांना मिळाला शरणार्थींचा दर्जा-

2018 मध्ये 29,169 भारतीयांनी शरणार्थीसाठी अर्ज केला. त्यातील केवळ 2,133 जणांना केवळ सकारात्मक उत्तर मिळाले. 2018 च्या अखेरपर्यंत 51,812 अर्ज प्रलंबित होते.

2018 मध्ये अमेरिकेने सर्वाधिक 1,531 भारतीयांना शरणार्थींचा दर्जा दिला. त्यानंतर कॅनडा (280), इटली (120), यूके (68) आणि ऑस्ट्रेलिया (51) या देशांनी भारतीयांना शरणार्थींचा दर्जा दिला आहे.

Leave a Comment