रेल्वेच्या वेगाने धावणारा शान घोडा


भारतात सध्या एक्सप्रेस रेल्वेचा वेग सरासरी ताशी ८० किमी आहे. रेल्वेच्या या वेगाशी बरोबरी करून धावण्याचे आव्हान कोण स्वीकारू शकणार? पण आहे. असाही एक प्राणी आहे जो रेल्वेच्या या वेगाशी बरोबरी करू शकतो. हा प्राणी आहे एक घोडा ज्याचे नाव आहे शान. नावाप्रमाणेच थाटामाटाची राहणी असलेला हा घोडा महाराष्ट्रात सारंगखेडा येथे सुरु असलेल्या चेतक महोत्सवाचे आकर्षण बनला आहे.

शानचे मालक तारासिंग हे पंजाबच्या अमृतसरचे रहिवासी आहेत. शान मारवाड जातीचा घोडा असून त्याची उंची ५.५ फुट आहे. त्याला दिवसाला १०० ग्राम गावरान शुद्ध तूप आणि ५०० रुपयाचे हरबरे खिलविले जातात. शानची किंमत आहे तब्बल १० कोटी रुपये. आजही शान देशात घोडदौडीत चँपियन आहे. तो ताशी ८० किमी वेगाने धावतो. त्याने मुक्तसर मेळ्यात दोन वेळा, पतियाला स्पर्धेत एक वेळा, जोधपूर येथील स्पर्धेत एकदा तर पुष्कर मेळ्यात एकदा असा पाच वेळा विजय मिळविलेला आहे.

सारंगखेडा येथील उत्सवात पंजाबच्या शान बरोबर राजस्थान, हरियानासह अनेक राज्यातून घोडे आणले गेले आहेत.

Leave a Comment