नाताळसाठी सजले जगातील सर्वात छोटे पार्क

park
जगभरच्या मोठ्या लहान शहरातून, गावातून बागा असतातच. काही प्रचंड मोठी उद्याने तर काही छोट्या बागा बगीचे, काही नैसर्गिक तर काही माणसांनी उभारलेल्या या बागा मोकळ्या हवेत फिरण्याचा आनंद देतात. जगातील सर्वात छोटी बाग किंवा पार्क अमेरिकेतील ओरेगोन भागात मिल एन्ड्स पार्क नावाने प्रसिद्ध असून त्याची नोंद गिनीज बुक मध्ये केली गेली आहे. दोन माणसे जेमतेम उभी राहू शकतील एवढ्या आकाराची हि बाग एका मोठ्या आकाराच्या भांडयाएवढी असून ती नाताळ साठी सजली आहे. या बागेत क्रिसमस ट्री उभारले गेले असून त्यावर सजावट केली गेली आहे. त्याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले गेले आहेत.

millend
दोन फुटाच्या वर्तुळात उभारली गेलेली हि बाग पार्क रोड, नायरोपार्क वे मधोमध आहे. हे पार्क १९४८ साली बनविले गेले मात्र गिनीज बुकमध्ये त्याची नोंद १९७१ साली घेतली गेली. या पार्कची कथा अशी, डिक फॅगन नावाचा पत्रकार ओरेगोन जर्नल मध्ये लिखाण करत असे. त्याने एकदा ऑफिस मध्ये जाताना विजेचा खांब रोवण्यासाठी रस्त्यात खोदलेला छोटा खड्डा पहिला. पण बराच काळ गेला तरी खांब रोवला गेला नाही तेव्हा डिकने या खड्ड्यात फुलांची झाडे लावली आणि त्याला मिल एन्ड्स पार्क असे नाव दिले. हे पार्क त्याने आयर्लंडचा संत सेंट पेट्रिक याला समर्पित केले.

डिकचा १९६९ साली कॅन्सरने मृत्यू झाला तरी त्याची आठवण म्हणून येथील नागरिकांनी हे पार्क काळजीपूर्वक जपले आणि १९७६ साली त्याला सिटी पार्क म्हणून घोषित केले गेले.

Leave a Comment