विमान प्रवासात हे कोडवर्ड ऐकले तर व्हा सावध


आजकाल विमान प्रवास ही फारशी नवलाईची गोष्ट राहिलेली नाही. विमान प्रवासाला आता बरेचजण चांगले सरावलेले असतील तरी अनेक फ्लाईट स्टाफ ज्या वेगळ्याच भाषेत बोलत असतात म्हणजे एकमेकांशी बोलताना ते जी कोड भाषा वापरतात त्याची प्रवाशांना काहीच माहिती नसते. कोणते असतात हे कोड वर्ड आणि काय असतो त्याचा अर्थ या विषयी थोडे समजून घेणे गरजेचे आहे.

हवाई सुंदरी अनेकदा त्यांच्या अन्य क्रू मेंबरशी बोलताना ब्ल्यू ज्यूस असा शब्द वापरतात. याचा अर्थ असा आहे की विमानातील स्वच्छतागृह खराब झाले आहे. यासाठी कोड वर्ड वापरायची काय गरज असे अनेकांना वाटेल पण विमानातील प्रवासी जनतेत निष्कारण विचित्र भावना निर्माण होऊ नये म्हणून हा कोड शब्द वापरला जातो.


शिप किंवा विमान प्रवासात मे डे हा शब्द बोटीचे कप्तान अथवा विमानातील पायलट वापरतात. हा शब्द त्यांनी उच्चारला तर परिस्थिती धोकादायक आहे याचा संदेश त्यांच्या साथीदारांना मिळतो. मात्र सलग तीन वेळा हा शब्द उच्चारणे म्हणजे धोक्याची सूचना देणे आहे. असाच दुसरा शब्द आहे कोड रेड. फ्लाईट आकाशात असताना काही मोठी अडचण आली असेल आणि विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागणार असेल तर ह शब्द वापरला जातो.

काही वेळा कोड वर्ड वापरण्याऐवजी काही आकडे उच्चारले जातात. त्यातील सर्वात महत्वाचा आकडा आहे ७५००. याचा सरळ अर्थ विमान हायजॅक झाले आहे असा आहे. डीच हा असाच आणखी एक कोडवर्ड आहे. विमानाचे काही आणीबाणीच्या परिस्थितीत पाण्यात लँडिंग करावे लागणार असेल तर डीच हा कोडवर्ड वापरला जातो.

Leave a Comment