येथे ६३ किलो शुद्ध सोन्याच्या नाण्यांपासून बनविले ख्रिसमस ट्री

chrismas
जर्मनीतील म्युनिख येथे युरोपमधील सर्वाधिक महागडे ख्रिसमस ट्री बनविले गेले असून त्याची किंमत २३ लाख युरो म्हणजे १८.५२ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. प्रोऑरम गोल्ड हाउस ने यंदा व्हिएन्ना फीलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा नावाने १९८९ साली बनविल्या गेलेल्या २४ कॅरेट सोन्याच्या नाण्यांचा वापर करून हे ट्री बनविले आहे.

व्हिएन्ना फीलहार्मोनिक ऑर्केस्ट्राच्या नावाने काढली गेलेली हि सोन्याची नाणी जगात विकल्या जाणारया सोन्याच्या नाण्यात सर्वाधिक विकल्या जाणारया नाण्यांपैकी एक आहेत. हे नाणे २८.३५ ग्रॅम वजनाचे आहे. या क्रिसमस ट्रीचे वजन ६३ किलो आहे म्हणजे इतक्या वजनाची नाणी यात वापरली गेली आहेत.

Leave a Comment