म्हणून नाताळात सजविले जाते क्रिसमस ट्री


नाताळचा सण आता अगदी तोंडावर आला असून बहुतेक ख्रिश्च नाच्या घरी क्रिसमस ट्री सजविण्याची लगबग सुरु आहे. नाताळ हा जगभर साजरा होतो आणि या काळात केवळ ख्रिश्चनच नाही तर अन्य धर्माचे लोकही घरांवर आरास करतात. घरोघरी सजनाऱ्या क्रिसमस ट्री मागे काही समज आहे. अनेक युरोपीय देशात ज्या फर वृक्षाची फांदी क्रिसमस ट्री म्हणून घरी आणली जाते त्यामागे फरच्या फांदीमुळे भूत, प्रेत, आत्मे घरात येत नाहीत असा समज आहे.

क्रिसमस ट्री सजविण्याची सुरवात जर्मनीत झाली ती १७ व्या शतकापासून असे मानतात. १९ व्या शतकात ही प्रथा इंग्लंडमध्ये सुरु झाली आणि त्यानंतर ती जगभर पसरली. याची कथा येशूच्या जन्माशी निगडीत आहे. असे मानतात जेव्हा मेरीच्या पोटी येशू जन्माला आला तेव्हा स्वर्गातून आलेल्या देवदूतांनी येशूला आशीर्वाद देताना सदाबहार फर वृक्षाची फांदी चांदण्या लावून सुशोभित केली होती असे उल्लेख आहेत. त्यामुळे क्रिसमस ट्री साठी फरच्या झाडाची फांदी आणण्याची प्रथा पाळली जाते.

क्रिसमस ट्री घरात सजविले की घरातील लहान मुलांचे आयुष्य वाढते, घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहते आणि घरात सकारात्मक उर्जा वाहते असेही मानले जाते. प्राचीन रोम मधील कथेनुसार एका वृक्षाची छोटी फांदी एका छोट्या बाळाचे जेवण व निवास याच्या बदल्यात काही आदिवासींना दिली गेली होती असे उल्लेख येतात. हे छोटे बाळ म्हणजेच स्वतः येशूच होता असा विश्वास आहे.

Leave a Comment